वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने नागपुरात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात मंगळवारी वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी राज्य समितीने आठ नावे निश्चित केली आहेत.
1)रामटेक –
2)भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट
3)गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी
4)चंद्रपुर -राजेश वारलुजी बेले
5)बुलढाणा -वसंत राजाराम मगर
5)अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर
6)अमरावती -कुमारी पर्जक्ता तारकेश्वर पिल्लेवान
7)वर्धा- प्रा.राजेंद्र साळुंके
8)यवतमाळ-वाशीम – सुभाष खेमसिंग पवार