: पुणे न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट काढलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक वॉरंट काढण्यात आलं आहे. या अटक वॉरंटवरून मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. मी दहशतवादी आहे का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला केला. त्यानंतर या अटक वॉरंटवरून प्रकाश आंबेडकरांनी सवाल उपस्थित केला आहे.
वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या अटक वॉरंटवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘तुम्ही अटक करुन काय कारणार, त्यानंतर ते अजून चिघळवतील’.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, ओबीसी समाज प्रचंड घाबरलाय. त्यात विशेषत: छोटा ओबीसी घटक घाबरलाय. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झालाय. काही दुकाने जाळली आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक असल्याचं दिसत आहे’.