पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामपंचायतीचे सरपंच झाले का? असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता ग्रामपंचायत सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार? एखाद्या गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे असे ज्याप्रमाणे सरपंचास वाटते तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही वाटू लागले आहे. म्हणूनच मी म्हणतोय की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झाले आहेत, अशा शब्दात बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली