Tuesday, May 28, 2024

तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 उमेदवार पाडू, मनोज जरांगे यांना इशारा…

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे. प्रकाश शेंडगे म्हणाले की, आम्ही सर्व जण छगन भुजबळ यांच्या पाठीमागे उभे राहू. त्यांना पाडण्याची भाषा मनोज जरांगेंकडून होत आहे. मात्र, तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 उमेदवार पाडू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. नाशिकमध्ये आम्ही सर्व जण प्रचारात उतरु. संख्येच्या गणितानं बघितलं तर छगन भुजबळ यांना पाडणं अशक्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

आता हे जरांगेंनी सर्व थांबवले पाहिजे. आमच्या उमेदवारीचा तोटा आणि फायदा कोणाला होईल यासंदर्भात आमची लढाई नाही. आमची लढाई ही आरक्षणाची आहे. आरक्षणाचे तीन तेरा सर्व पक्षाच्या लोकांनी वाजवले आहेत. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असे अनेकदा सिद्ध झालंय. व्हीव्हीपॅटचे ट्रेल मिळावेत यासंदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र लिहिणार आहोत, असे देखील प्रकाश शेंडगेंनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles