कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च नाबाद ४०० धावांच्या खेळीचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे.
एका लढतीत ४०० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कर्नाटकाचा युवा फलंदाज प्रखर चतुर्वेदीने स्थान मिळवले आहे.
चतुर्वेदीने १९ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईविरुद्ध नाबाद ४०४ धावांची खेळी केली आहे. सलामीवीर चतुर्वेदीने ६३८ चेंडूंचा सामना करून ही खेळी साकारली. यात त्याने ४६ चौकार लगावले, तर तीन षटकार खेचले. या जोरावर कर्नाटकाने पहिल्या डावात ८ बाद ८९० असा धावांचा डोंगर उभारला.
कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत सर्वोत्तम खेळी करणारा चतुर्वेदी पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर कर्नाटकाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेतेपदही मिळवले.