Monday, December 4, 2023

नगर जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ

*जिल्‍ह्यातील 29 ग्रामपंचायतींध्‍ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रधानमंत्र्यांच्‍या हस्‍ते 19 ऑक्‍टोबर रोजी ऑनलाईन शुभारंभ*
अहमदनगर दि. 18 ऑक्टोबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :- जिल्हयातील 29 ग्रामपंचायतीच्‍या ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते दि. 19 ऑक्‍टोबर 2023 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पध्‍दतीने करण्‍यात येणार आहे. या कार्यक्रमास त्‍या-त्‍या ग्रामपंचायतीमधील युवक-युवती, विद्यार्थी तसेच नागरीकांनी सहभाग नोंदविण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ यांनी प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे केली आहे.

जिल्हयातील अकोले तालुक्‍यातील केळी कोतुळ, राजुर, जामखेड तालुक्‍यातील नान्नज, खर्डा, कर्जत तालुक्‍यातील कोरेगांव, मिरजगांव, राशीन, कोपरगांव तालुक्‍यातील शिंगणापूर, संवत्‍सर, अहमदनगर तालुक्‍यातील नवनागापुर, नागरदेवळे, नेवासा तालुक्‍यातील घोडेगांव, सोनई, पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्‍वर, निघोज, पाथर्डी तालुक्‍यातील तीसगांव, मिरी, राहाता तालुक्‍यातील लोणी खुर्द, पुणतांबा, संगमनेर तालुक्‍यातील साकुर, आश्‍वी, शेवगांव तालुक्‍यातील दहीगाव ने, बोधेगांव, श्रीगोंदा तालुक्‍यातील काष्‍टी, बेलवंडी आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापुर बुद्रुक, निपाणी वडगांव व राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ व वांबोरी या ग्रामपंचायतीमध्‍ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ करण्‍यात येणार असल्‍याचेही प्रसिध्‍दी पत्रकात नमुद करण्‍यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: