नगर – राष्ट्रीय परिक्षा एजन्सी मार्फत संपूर्ण भारतात होणाऱ्या जेईई मेन परिक्षेत नगरमधील प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इ.12 वीत प्रथम आलेली विद्यार्थीनी कु.प्रणिता साहेबराव बोडखे हीने 98.40 इतके पर्सनटाईल मिळवून देशपातळीवरील परिक्षेत उत्तुंग यश मिळविले. तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षेत तिने देशपातळीवर 844 वे रँकिंग मिळवले. तिची भारतातील नामांकित मुंबईतील आयआयटी, पवई येथे बी.टेक. अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
तिला प्रगत विद्यालयाचे प्राचार्य सुनिल पंडित, सांदीपानी ॲकॅडमीचे संचालक के.बालराजु व राहुल गुजराल यांचे मार्गदर्शन लाभले. कु.प्रणिता हीचे इ.10 वी पर्यंतचे शिक्षण केंद्रीय विद्यालयात झाले आहे. मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10वीच्या परीक्षेत मध्ये तिला 95 टक्के गुण मिळाले होते. शालेय दशेतच तिने आयआयटी इंजिनिअर होण्याची जिद्द बाळगून चिकाटीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते. देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटीत प्रवेश मिळाल्याने तिने आनंद व्यक्त करीत आपल्या यशाचे श्रेय कुटुंबासह शिक्षकांना दिले आहे.
कु.प्रणिता ही सीताराम सारडा विद्यालयातील शिक्षक साहेबराव बोडखे व देवळाली प्रवरा येथील जि.प. शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी यांची मुलगी तर आनंद विद्यालयाचे शिक्षक विठ्ठल बोडखे यांची पुतणी आहे. तिला हिंद सेवा मंडळाचे माजी कार्याध्यक्ष राजेंद्र चोपडा यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल राजेंद्र चोपडा यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल दि प्रोग्रोसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विजया रेखे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, सेक्रेटरी सुनील बद्रीलाल रुणवाल, खजिनदार उमेश चंद्रकांत रेखे, कार्यकारणी सदस्य किरण सुधाकर वयकर, महेश चंद्रकांत रेखे, उदय भणगे, ज्येष्ठ मार्गदर्शक दि.ना.जोशी आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे.