मराठी चित्रपट व मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहेरेला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच प्रार्थनाने मुंबईपासून दूर अलिबागला निसर्गरम्य ठिकाणी तिचं नवीन घर खरेदी केलं होतं. या घराची संपूर्ण झलक तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर दाखवली होती. नवीन घर खरेदी केल्यावर आता प्रार्थनाने तिच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
प्रार्थनाने तिच्या नवऱ्याच्या साथीने मुंबईतील अंधेरी परिसरात नवीन ऑफिस घेतलं आहे. प्रार्थना-अभिषेकने आज जोडीने त्यांच्या नवीन ऑफिसची पूजा केली. पारंपरिक पद्धतीने पूजा करुन अभिनेत्रीने नवऱ्याच्या साथीने तिच्या नव्या ऑफिसमध्ये प्रवेश केला.प्रार्थनाच्या नव्या ऑफिसचं नाव ‘रेड बुल स्टुडिओ’ असं आहे. तिचा नवरा अभिषेक जावकर दिग्दर्शक-निर्माता असल्याने भविष्यात सिनेसृष्टीतील अनेक प्रोजेक्टवर काम करण्यासाठी दोघांनाही या नव्या ऑफिसची मदत होणार आहे. प्रार्थनाने शेअर केलेला नव्या ऑफिसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तिने “फक्त कृतज्ञता…” असं कॅप्शन दिलं आहे.