Wednesday, April 17, 2024

लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा जिंकता येणार नाही….तर काँग्रेस…

रणनीतीकार आणि जन सूरज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपले भाकीत केलं आहे. ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी 100 जागांचा आकडा पार करणे खूप कठीण आहे. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, ‘या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र, यावेळी ती पश्चिम बंगालमध्येही चांगली कामगिरी करू शकते.या निवडणुकीत काँग्रेस शंभरचा टप्पा ओलांडणार का? असा प्रश्न प्रशांत किशोर यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, लोकसभेतील काँग्रेसच्या सध्याच्या जागांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही.
ते म्हणाले, ‘जागांची संख्या 50-55 झाली तरी देशाचे राजकारण बदलणार नाही. काँग्रेसच्या निवडणुकीच्या निकालात मला कोणताही सकारात्मक बदल दिसत नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र काँग्रेस 100 चा आकडा पार करेल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या 370 जागा जिंकण्याचे लक्ष्याबद्दल विचारले असता किशोर म्हणाले, भाजपने आपल्या कार्यकर्त्यांसाठी 370 चे लक्ष्य ठेवले आहे. लोकांनी 370 चे हे लक्ष्य खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला ध्येय निश्चित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी हे साध्य केले तर चांगले आहे. जर ते शक्य नसेल तर पक्षाने आपली चूक मान्य करण्याइतपत नम्रपणे वागले पाहिजे. त्यांच्या मते, 2014 नंतर अशा 8-9 निवडणुका झाल्या ज्यात भाजपला आपले निर्धारित लक्ष्य गाठता आले नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles