Monday, June 17, 2024

आयेगा तो मोदी ही, पण भाजपा किती जागा जिंकणार? प्रशांत किशोर म्हणाले…

लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील एकूण ४२८ जागांवर मतदान पूर्ण झालं आहे. आता केवळ दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जूनरोजी काय होणार? याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपाला ४०० जागा मिळणार की इंडिया आघाडीचे सरकार येणार असे एक ना अनेक मुद्दे या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, याबाबत आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे.

प्रशांत किशोर यांनी नुकताच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना ४ जून रोजीच्या निकालाबाबतही विचारण्यात आलं. याबाबत बोलताना, ४ जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. तसेच २०१९ प्रमाणे भाजपाला ३०० किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.
प्रशांत किशोर म्हणाले, “पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्ही वाढताना दिसून येत आहे. दक्षिण पूर्व भागात भाजपाच्या १५ -२० जागा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर पश्चिम भागातही भाजपाचे फार काही नुकसान होईल, असं वाटत नाही.”

लोकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी असली हा राग व्यापक स्वरुपात दिसलेला नाही. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचा निकाल बघितला तर भाजपाला २७२ जागा मिळणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, यावेळी भाजपाच्या बाजुने दावे केले जात आहेत. ४०० जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

भारतात विरोधक कमजोर आहे, असा दावा केला जातो. मात्र हे सत्य नाही. सद्यस्थिती बघता, देशात विरोधक कमजोर आहे आणि मोदी सरकार सगळे खुश आहे, असं म्हणणं धाडसाचे ठरेल. आजपर्यंत देशपातळीवर कोणत्याही पक्षाला ५० टक्के मते मिळालेली नाही. विशेष म्हणजे जनतेने सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांना जास्त मते दिली आहेत. ज्यावेळी या देशात सीएए-एनआरसी कायदा लागू करण्यात आला, त्यावेळी देशात विरोधापक्षांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. त्यामुळे देशात विरोधक नाहीत किंवा ते कमजोर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे”, असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles