Tuesday, June 25, 2024

Ahmednagar news: तोल गेल्याने तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

अहमदनगर -शहराजवळून वाहणार्‍या प्रवरा नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.19 मे) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरातील मोठ्या पुलाजवळ घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की गौतम उर्फ शाहरुख दगडू यरमल (वय 35, रा. संगमनेर खुर्द) हा तरुण छोट्या पुलावरून संगमनेर खुर्दकडे घरी जात असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो प्रवरा नदीच्या वाहत्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला
सध्या नदीला शेतीचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. दरम्यान, मोठ्या पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात वाहून चालला असल्याचे नदीत पोहणार्‍या तरुणांच्या निदर्शनास आले. ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भान्सी, उपनिरीक्षक सुनील माळी, पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार, वाहन चालक मोरे हे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलावर आले. त्यावेळी सदर तरुणाचा मृतदेह प्रवरा नदीच्या (Pravara River) छोट्या पुलावरून मोठ्या पुलापर्यंत वाहत आल्याची माहिती पोहणार्‍या तरुणांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत त्या तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles