Tuesday, February 18, 2025

चक्क पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी संबंधित संस्थेकडून लाच…बडा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे.

अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२, रा. वैध मापनशास्त्र, श्रीरामपूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करुन स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी गायकवाड याने १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. १० हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड याला पकडण्यात आले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती पुण्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानंतर पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण, सहायक फौजदार मुकुंद आयचित, हवालदार नवनाथ वाळके, चालक दामोदर जाधव यांनी गायकवाड याच्या सिंहगड रोडवर येथील निवासस्थानी सोमवारी रात्री तातडीने घरझडती घेण्यात आली. त्यात कपाटामध्ये नोटांची बंडलच्या बंडल आढळून आली. ती तब्बल २८ लाख ५० हजार रुपये होते. याशिवाय घरात मालमत्तेसंदर्भात अनेक कागदपत्रे आढळून आली आहेत. पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles