Saturday, March 2, 2024

Video: कहरचं! भावी डॉक्टर दांपत्याचा ऑपरेशन थिएटरमध्ये प्री वेडिंग फोटोशूट

लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या प्री वेडिंगसाठी अनेकजण भन्नाट स्टाईल, हटके लोकेशन्स शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आत्तापर्यंत हिल स्टेशन, मंदिरे, समुद्रकिनारी केलेले वेडिंग फोटोशूट तुम्ही अनेकदा पाहिले असतील. मात्र कर्नाटकच्या एका कपलने चक्क सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएयरमध्येच प्री वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार समोर आला आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका भावी डॉक्टर दांपत्याला लग्नापुर्वीचे पी वेडिंग फोटोशूट चांगलेच महागात पडले आहे. भरमसागर सरकारी रुग्णालयातील एका भावी डॉक्टर कपलने ऑपरेशन थिएटरमध्येच प्री वेडिंग करण्याचा प्रताप केला. या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे.
अभिषेक असे या निलंबित डॉक्टरचे नाव आहे. या प्री वेडिंग शूटमध्ये डॉक्टर अभिषेक हे पेशंटचे ऑपरेशन करत आहेत तर त्यांची होणारी पत्नी ही त्यांना मदत करत असल्याचे दाखवण्यात आले होते. या धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ, फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles