Monday, December 4, 2023

नगर शहरात गणेश विसर्जनाची तयारी, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिस स्टेशनमध्ये बैठक…दिले हे आदेश

कोतवाली पोलीस स्टेशन
गणेश उत्सव निमित्त करण्यात आलेली प्रतिबंध कारवाई खालील प्रमाणे

Crpc 144(2) प्रमाणे 3 दिवसांसाठी नगर शहरात प्रवेश बंदी – 141

Crpc 107,110,महापोकाक 56 ,93 ,151(3) प्रमाणे प्रतिबंध कारवाई – 120

Crpc 149 प्रमाणे शांतता राखण्यासाठी नोटीस – 142

एकूण – 403 इसमानवर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे..

100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असून ठीक ठिकाणी पत्र्याचे तसेच लाकडी बॅरिकेटिंग करण्यात येत आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा आणि अनुषंगाने मिरवणुकीतील सर्व १७ अध्यक्ष व पदाधिकारी यांची मीटिंग घेण्यात आली. असून त्यांना वेळतच मिरवणूक सुरू करण्याबाबत आणि संपवण्याबाबत कळविले आहे त्यांनी त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

सदर मीटिंग करिता संगम तरुण मंडळ ऋषिकेश कावरे, माळीवाडा तरुण मंडळ निलेश खरपुडे, महालक्ष्मी तरुण मंडळ गणेश साठे, नवजवान मित्र मंडळ गोटू शेठ ढुमणे, दोस्ती तरुण मंडळ उमेश भाग नगरे, आदिनाथ तरुण मंडळ किरण जंजाळे, नीलकमल मित्र मंडळ अमित बोराटे, नवरत्न तरुण मंडळ स्वप्नील घुले, दोस्ती मित्र मंडळ संग्राम रासकर, विक्रम राठोड शिवसेना ठाकरे गट शहर, शिवसेना शिंदे गट, जय आनंद तरुण मंडळ, शिवप्रताप मित्र मंडळ असे उपस्थितीत होते.

उपस्थितीत पदाधिकारी यांना मिरवणूक उत्साहात व शिस्तबद्ध कशा पद्धतीने पार पाडता येईल याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच मिरवणूक दिलेल्या वेळेप्रमाणे काढण्यात यावी दोन मंडळामध्ये खूप अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी. अशा इतर महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या…

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: