अहमदनगर -18 व्या लोकसभेत नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व कोण करणार हे आज स्पष्ट होणार आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असणारी धावपळ आज जाहीर होणार्या निकालानंतर संपणार आहे. जिल्ह्यातील मतदार राजाने कौल कोणाला दिला हे दुपाारी एकनंतर स्पष्ट होण्यास सुरू होणार आहे. दरम्यान लोकसभेच्या नगर आणि शिर्डी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात. दुपारी एकनंतर जिल्ह्यातील कल स्पष्ट होणार असल्याचा अंदाज आहे.
नगर एमआयडीसीच्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये नजरबंद करण्यात आलेले आहेत. याठिकाणी गेली काही दिवसांपासून पोलिसांसह लष्करी जवानांचा जागता पहारा होता. देशात सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यावर आज 4 जूनला एकाचवेळी देशासह राज्यातील आणि नगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. दरम्यान, नगर आणि शिर्डीच्या मतदारसंघाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली असून सोमवारी प्रत्यक्षात मतमोजणीची रंगित तालिम घेण्यात येऊन निवडणूक कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या मतमोजणीसाठी 900 कर्मचार्यांसह राखीव कर्मचार्यांची तजवीज करण्यात आलेली असून काल दिवसभर मतमोजणी परिसरात अधिकारी- कर्मचारी, पोलीस बळाची धावपळ सुरू होती.