Tuesday, February 11, 2025

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील राजेंद्र वाघ यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोसई/राजेंद्र देवमन वाघ यांना दिनांक 26 जानेवारी, 2025 रोजी भारतीय गणराज्य दिन निमित्ताने राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर.

पोसई/राजेंद्र देवमन वाघ यांनी पोलीस दलातील 34 वर्षे विशेष व उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
1. अहिल्यानगरजिल्ह्यातील आण्णा लष्करे, पाप्या शेख अशा सराईत गुंडांच्या टोळ्या पकडणे
2. परराज्यातील गावठी पिस्तुल (कट्टे) तयार करणारे 188 गुन्हेगारांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 101 देशी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) व 263 जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
3. अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेले पेट्रोलपंपावरील दरोडे व जिल्ह्यातील इतर 154 दरोडेखोरांना अटक करुन त्यांचेकडुन 74,81,000/- रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला आहे.
4. रात्री व दिवसा अशा 36 घरफोडी गुन्ह्यातील 156 गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेकडुन दिडकोट रुपये किंमतीचा चोरीस गेलेला माल जप्त केला आहे.
5. अहिल्यानगर जिल्ह्यातील 74 अट्टल फरार गुन्हेगारांना अटक.
6. अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट चलनी नोटा ख-या असल्याचे भासवुण चलणात आणणारे 2 आरोपींना 60000/- रुपये किंमतीच्या बनावट चलनी नोटांसह ताब्यात घेतले आहे.
7. खडकवाडी, ता. पाथर्डी येथे 11 वर्षापुर्वी घडलेला ना उघड खुनाच्या गुन्ह्याची उकल करुन आरोपीचा शोध घेवुन अटक
8. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी करणारे 20 सराईत गुन्हेगारांचा शोध घेवुन त्यांचेकडुन 120 चोरीच्या मोटार सायकल हस्तगत.
9. महाराष्ट्र राज्यात गाजलेला खटला- शाळकरी मुलगी नामे अंबिका डुकरे व जयश्री डांगे यांचा बलात्कार करुन खुन करणारा नेवासा येथील नराधम आरोपी अनिल पवार यास अटक करुन दुहेरी फाशीचे शिक्षेपर्यंत पोहचविले.
10. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चीत कांडेकर खुन खटल्यातील 3 शार्प शुटरचा गोवा राज्य व पुणे जिल्हा येथुन अटक व आरोपींना मा. न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
11. अहिल्यानगर शहरात सन 2004 साली शिवजयंती साजरी होतांना मिरवणुक मार्गावर घातपाताचे तयारीतील 15 आरोपींचे कब्जातुन 35 लि. ऍ़सिड, 13 चॉपर, 43 लाकडी दांडके, 2 तलवारी, 200 रिकाम्या बाटल्या अशी हत्यारे वेळीच ताब्यात घेतल्याने मोठी घातपाताची घटना टळली आहे.
12. शिर्डी येथील प्रतिष्ठीत कुटूंबातील 2 मुलांचे अपहरण करुन खुन करणारा आरोपी पाप्या सलीम ख्वाजा शेख आणि त्यांचे इतर 11 साथीदारांची गुप्तबातमीदारांकडुन माहिती घेवुन अटक केली व सर्व 12 आरोपी विरुध्द मोक्का अन्वये गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यात मा. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
13. भरोसा सेल येथे कामकाज करत असतांना 125 कौटुंबिक प्रकरणांमध्ये समुपदेशकाची महत्वपुर्ण भुमिका बजावुन त्यांचे संसार पुर्न:स्थापित करण्यात मोलाचा वाटा उचलला व अहिल्यानगर शहरातील शाळा कॉलेज परिसरात 1148 मुलींची छेडछाड करणारे तरुण टोळक्यांचे समुपदेशन करुन त्यांना अशा गोष्टीपासुन परावृत्त केले.
14. मा. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोसई/राजेंद्र वाघ यांना 370 बक्षिसे व 1,64,800/- रुपये रोख रक्कम व 29 प्रशंसापत्र तसेच सलगपणे 16 वर्षे A+ शेरा दिलेला आहे.
15. सन 2016 मध्ये मा. पोलीस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पोलीस महासंचालक पदक देवुन सन्मानित केलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर नेमणुकीचे पोसई/राजेंद्र वाघ यांचा मोठ्या प्रमाणात
असलेला जनसंपर्क व त्यांची अतिशय प्रामाणिक, निष्ठावान व उत्कृष्ट पोलीस अधिकारी अशा प्रतिमेमुळे पोलीस दलाची प्रतिमा सामान्य जनतेमध्ये सुधारण्यास मदत झाली आहे.
पोसई/राजेंद्र देवमन वाघ यांना भारतीय गणराज्य दिना निमित्ताने राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झाल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, मा.श्री.दत्तात्रय कराळे साहेब, तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मा.श्री.राकेश ओला साहेब, व अहिल्यानगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.प्रशांत खैरे साहेब व श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक, मा.श्री.वैभव कलुभर्मे साहेब, व पोलीस उपअधीक्षक (ठाणे) मा.श्री.अशोक राजपुत साहेब व पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर मा.श्री.दिनेश आहेर साहेब अशांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles