अहमदनगर करंजी : करंजी (ता. पाथर्डी) येथे शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या माळीबाभूळगाव प्राथमिक शाळेतील शिक्षकाला सोमवारी अखेर जिल्हा परिषदेने निलंबित केले.शिक्षक बँकेचे माजी संचालक असलेले प्राथमिक शिक्षक संतोष अशोक अकोलकर असे निलंबित शिक्षकाचे नाव आहे. माळीबाभूळगाव (भडकेवस्ती) येथील प्राथमिक शाळेवर ते शिक्षक आहेत. करंजी येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेचा १२ फेब्रुवारीला संतोष अकोलकर यांनी विनयभंग केल्याची फिर्याद पाथर्डी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. करंजी येथील फिर्यादी महिला शेतात काम करत असताना शिक्षक
अकोलकर तेथे गेले. ‘तुझ्या पतीने माझ्या बायकोच्या विरोधात संस्थेकडे तक्रार केली. त्यामुळे पत्नीची बदल झाली, असे म्हणत शिक्षक अकोलकर यां हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा घडलेला प्रका घरच्यांना किंवा बाहेर कोणाजवळ
सांगितल्यास जिवे मारण्याची धमर्क दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटल आहे. या प्रकारानंतर परिसरातील
ग्रामस्थांनी शिक्षकाच्या निलंबनाच मागणी केली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने गंभी दखल घेऊन संतोष अकोलकर य शिक्षकास सोमवारी अखेर निलंबित केले. निलंबन काळात अकोलकर यांचं मुख्यालय राहुरी पंचायत समित राहणार आहे. त्यांच्या परवानगीशिवार अकोलकर यांनी कोठेही जाऊ नये असेही आदेशात म्हटले आहे.