देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहिल्यानगरचे महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना शुभेच्छा पत्र पाठवून निवडणूकीसाठी शुभेच्छा व्यक्त करून अहमदनगरच्या प्रगतीचा आपला अनुभव आणि असेलेले विकासाचे व्हिजन भविष्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका निभावेल असा आशावादही व्यक्त केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाच्या पुर्वसंध्येला डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठविलेल्या पत्रात त्यांच्या गौरवपुर्ण उल्लेख करून तुमच्या सारख्या युवा आणि उर्जावान साथीदारामुळे मला अधिक मजबूती मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.
या पत्रात, डॉ. सुजय विखे यांचा वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राकरिता महत्वपुर्ण ठरणार आहे. या मतदार संघाचे नेतृत्व करताना आपण सामाजिक सेवेवर लक्ष केंद्रीत केले यामुळेच जनता जनार्दनाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी राहील, आणि येणाऱ्या नव्या सरकार मध्ये आपण सर्वजन मिळून देश वासियांच्या आशा आणि आकांशा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करू यासाठी आपल्या सारख्या उर्जावान खासदारांचे नक्कीच पाठबळ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मागील १० वर्षात गरीब, शेतकरी,महिला, युवा आणि बहुजन समाजाचे जीवनमान उचांवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. यामुळे देशातील जनता आपल्या बरोबर असून डॉ. सुजय विखेंच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाची लोकसभेची निवडणूक ही देशाच्या भवितव्यासाठी असून आपण २४ तास सातही दिवस २०४७ पर्यंत विकसीत देशाची हमी आपण जनतेला देत आहोत. यामुळे विकसित भारतासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना मदतानासाठी प्रोत्साहित करून आपला प्रत्येक बुथ कसा जिंकेल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा संदेश त्यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.
“ पंतप्रधानांचे हे पत्र फार उर्जादायी आणि प्रेरणादायी आहे. सदरच्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यासाठी जे गौरवपर उद्गार काढले आहेत. याने माजी जनतेच्या प्रती जबाबदारी वाढली असून. पंतप्रधानांनी जो विश्वास दाखविला त्यास कधीही तडा जावू देणार नाही. अधिक क्षमतेने आणि उर्जेने लोकांसाठी काम करण्याचा माझा निर्धार आहे.” – खा. डॉ. सुजय विखे पाटील.