बीड जिल्ह्यात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाविषयी आंदोनलातच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू करण्यात आलं आहे. १६ तारखेपासून अधिवेशन सुरू असून, या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. १२ डिसेंबरपासून मनाई लागू करण्यात आला असून, २७ डिसेंबरपर्यंत हा मनाई आदेश लागू असणार आहे.
बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. अशातच बीड जिल्ह्यात १२ ते २७ डिसेंबरपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलाय. दरम्यान, जिल्ह्यात मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर, पाच पेक्षा अधिक जणांना परवानगीशिवाय एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. त्याशिवाय मार्चा, आंदोनले, सभा, उपोषणे परवानगीशिवाय घेणयासही बंदी असणार आहे.दरम्यान, बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ, सकल मराठा बांधवांच्यावतीनं बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आलीय. बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यात हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसेत बीड जिल्ह्यातील जनतेकडूनही या आदेशाचं पालन करण्यात येत आहे.
‘संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जिल्ह्याला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहे. माझा पोलिसांवर भरोसा नाही. मोबाईल सापडले, परंतु ते जाहीर करत नाहीत. हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावे. आरोपीला लवकरात लवकर अटक करणे गरजेचं आहे.’ असं खासदार बजरंग सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात म्हटलं आहे.