शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा.
आम्हाला शिकवू द्या या मागणी साठी एकवटले जिल्ह्यातील नऊ हजार शिक्षक.
प्राथमिक शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मागणी करणार- खासदार निलेश लंके व आमदार सत्यजित तांबे.
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या असुन शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जाऊन शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे आम्हाला शिकवू द्या असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील ९ हजार शिक्षकानी आक्रोश मोर्चा काढला असून या आक्रोश मोर्चाला खासदार निलेश लंके यांनी पाठिंबा दर्शवीत म्हणाले की, शिक्षकाचा मुलगा असून शिक्षकांची अडीअडचणी मला माहित आहे. त्यामुळे मी शिक्षकांचे प्रश्न हे दिल्लीत मांडणार व शिक्षकांनी कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन कामे करू नये असल्याची भावना व्यक्त केली व आमदार सत्यजित तांबे यांनी देखील पाठिंबा देत म्हणाले की, शिक्षकांना दिलेल्या ऑनलाईन कामामुळे गोरगरीब जनतेचे मुले शिक्षणापासून वंचित होत आहे व सरकारचा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा डाव आहे की काय असा सवाल करत शिक्षकांच्या प्रत्येक मागणीसाठी आवाज उठवणार असल्याची भावना व्यक्त केली. असुन सततच्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. २० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे.यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे. दि. १५ मार्च २०२४ व दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयामुळे या असंतोषात भरच पडली आहे. विशेष म्हणजे या शासन निर्णयामुळे शिक्षण हक्क कायदा २००९ मधील तरतुदीचा उघड उघड भंग केला जात आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राज्यातील सर्व सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि प्राथमिक शिक्षकांना वेठबिगारासारखे त्या प्रयोगासाठी राबवले जात आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच शिल्लक नाही. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना १९८२ सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे , शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, १०-२०-३० वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू कराणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शाळाबाह्य व ऑनलाईन कामाच्या ओझ्या खाली शिक्षक अक्षरशः दबून गेला आहे. विविध प्रकारची सर्वेक्षणे, वेगवेगळ्या ऑनलाईन माहित्यांची लिंक, एक्सेल फाईल तातडीने भरणे, विविध उपक्रमांचे फोटो लिंकवरून अपलोड करणे, शाळास्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या ११ समित्यांची बैठक घेणे, इतिवृत्त तयार करणे, आवश्यक मालाचा पुरवठा नसताना बदललेल्या पाककृतीप्रमाणे शालेय पोषण आहार देण्याचे अनाकलनीय आदेश, अत्यंत कमी शिलाई खर्चामध्ये स्थानिक स्तरावर गणवेश शिवून घेणे इत्यादी अनेक वेगवेगळे शाळाबाह्य कामे सध्या शिक्षकांच्या माथी मारलेली आहेत त्यामुळे मुलांना शिकवण्याच्या मूळ कामापासून शिक्षक दूर गेला असल्याचा आरोप जिल्ह्यातील सर्व संघटनांकडून करण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आम्हाला शिकवू द्या’ हया मागणी साठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये शिक्षक समन्वय मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष श्री केशवराव जाधव अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकळ, बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे, संजय कळमकर, सिताराम सावंत, बबन गाडेकर, दत्ता पाटील कुलट विद्या ताई आढाव बाबासाहेब सालडे, प्रवीण झावरे प्रवीण ठुबे नाना गाढवे कल्याण लवांडे, गोकुळ कळमकर, अशोक नवसे, शरद वाढेकर, संतोष दुसुंगे, गजानन जाधव, सुनील शिंदे,, संजय धामणे, प्रदीप दळवी, संतोष खामकर, एकनाथ व्यवहारे अरविंद थोरात, गणेश महाडिक, नवनाथ राठोड,सचिन नाबगे साहेबराव अनाप, सुनील पवळे, अर्जुन शिरसाट, संतोष सरोदे, गा. मा. मिसाळ महासरे सर नवनाथ अडसूळ दत्ता जाधव प्रकाश नांगरे नारायण पिसे विजय महामुनी आदीसह अहमदनगर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.