अहमदनगर मध्ये शिक्षकांचा आम्हाला शिकवू द्या या मागणी साठी आक्रोश मोर्चा.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत शिक्षकांना शिकवण्याचे काम सोडून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच मिळत नाही त्यामुळे आम्हाला शिकवू द्या असा टाहो फोडत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे देण्यात आली
सततच्या अशैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकविण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचे धोरण सरकारने आखले आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचे काम सरकार करत आहे. २० पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचे धोरण राबवत आहे. शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही. प्रश्न समजून घेणे व त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे. दिनांक 15 मार्च 2024 व दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयामुळे या असंतोषात भरच पडली आहे. विशेष म्हणजे या शासन निर्णयामुळे शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदीचा उघड उघड भंग केला जात आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकविणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक रजा घेऊन दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत आहेत.
सध्या राज्याच्या शिक्षण खात्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग राबवले जात आहेत आणि प्राथमिक शिक्षकांना वेठबिगारासारखे त्या प्रयोगासाठी राबवले जात आहे. त्यामुळे शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच शिल्लक नाही.
नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना 1982 सालची जुनी पेन्शन योजना लागू करणे , शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतींमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली असून ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करणे, 10-20-30 वर्ष सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना प्राथमिक शिक्षकांना लागू कराणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, अशैक्षणिक कामे कमी करणे इत्यादी प्रमुख मागण्यांसह शिक्षकांच्या इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षक सामूहिक रजेवर जाऊन बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
शाळाबाह्य व ऑनलाईन कामाच्या ओझ्या खाली शिक्षक अक्षरशः दबून गेला आहे. विविध प्रकारची सर्वेक्षणे, वेगवेगळ्या ऑनलाईन माहित्यांची लिंक, एक्सेल फाईल तातडीने भरणे, विविध उपक्रमांचे फोटो लिंकवरून अपलोड करणे, शाळास्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या ११ समित्यांची बैठक घेणे, इतिवृत्त तयार करणे, आवश्यक मालाचा पुरवठा नसताना बदललेल्या पाककृतीप्रमाणे शालेय पोषण आहार देण्याचे अनाकलनीय आदेश, अत्यंत कमी शिलाई खर्चामध्ये स्थानिक स्तरावर गणवेश शिवून घेणे इत्यादी अनेक वेगवेगळे शाळाबाह्य कामे सध्या शिक्षकांच्या माथी मारलेली आहेत. त्यामुळे मुलांना शिकवण्याच्या मूळ कामापासून शिक्षक दूर गेला असल्याचा आरोप जिल्ह्यातील सर्व संघटनांकडून करण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने 25 सप्टेंबर रोजीच्या ‘आम्हाला शिकवू द्या’ हया मागणीसाठी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
मोठ्या संख्येने अन्याय विरुद्ध लढण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या मार्फत करण्यात येत आहे .
कंत्राटी शिक्षक भरती व 15 मार्च 2023 चा संच मान्यता शासन आदेश रद्द करण्यात यावा अशी प्रमुख मागणी समन्वय समितीची आहे. कंत्राटी शिक्षक भरती न करता थेट शिक्षक भरती करावी शिक्षण सेवक योजना देखील आता रद्द करण्याची वेळ आली आहे कारण ती देशात इतर राज्यात कुठेच नाही .या व इतर मागण्यांसाठी 25 तारखेला होणाऱ्या मोर्चा जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी या मोर्चात सहभागी व्हावे जिल्हा समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे .