एकच मिशन जुनी पेन्शन तीव्र निदर्शने
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने पुकारलेल्या एक दिवशीय धरणे आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचे निषेध व्यक्त करणे याकरिता आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी क्रांतीदिनी पंचायत समिती संगमनेर येथे ग्रामसेवकांचे नेते एकनाथराव ढाकणे व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष सुनील नागरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आज पंचायत समिती संगमनेर समोर तीव्र स्वरूपाचे निदर्शना करण्यात येऊन एकच मिशन जुनी पेन्शन सरकारचं याबाबतचे धोरण राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची भूमिका विशद करून सरकारने तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सरसकट लागू करावी आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेले परंतु 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात अथवा अधिसूचना निघालेली कर्मचारी अधिकारी यांना सदर योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे.
ती पूर्वलक्षी प्रभावाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी.असा आदेश निर्गमित व्हावा व अन्य प्रमुख मागण्या करिता आज तीव्र स्वरूपाचे निदर्शना करून सरकारच्याबाबत वेळ काढूपणाचे जे काही धोरण चालू आहे तर त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भविष्यात जर सरकारने राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न तातडीने न सोडवण्यास नजीकच्या काळात बेमुदत संप अटळ आहे.याबाबत सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी व कर्मचाऱ्यांच्या न्याय प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करावी असे आपल्या भाषणात श्री ढाकणे यांनी सांगितले.याप्रसंगी उपस्थित कर्मचारी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकच मिशन जुनी पेन्शन च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व सर्वांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल राज्य विभागीय उपाध्यक्ष सुनील नागरे यांनी सर्वांचे आभार मानून तीव्र स्वरूपाच्या निदर्शनाची सांगता झाली.
वृत्त संकलन
अहमद शेख
अध्यक्ष
संगमनेर तालुका ग्रामसेवक संघटना