श्रीगोंदा येथे जप्त गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव
अहमदनगर – श्रीगोंदा तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या गहू आणि तांदुळाचा जाहीर लिलाव शासकीय धान्य गोदाम पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत करण्यात येणार आहे.
लिलावात सहभागी होण्याकरिता १० हजार रूपये अनामत रक्कम भरणे बंधनकारक राहील. लिलावाबाबतच्या सर्व अटी व नियम लिलावाच्या दिवशी लिलावाच्या ठिकाणी पाहावयास मिळतील. लिलाव देण्याचा अथवा नाकारण्याचा पूर्ण अधिकार तहसील कार्यालयाने राखून ठेवला आहे. लिलावात सहभाग घेण्याकरीता इच्छुक भुसार माल खरेदी विक्री वैध परवानाधारकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार श्रीगोंदा यांनी केले आहे.