Wednesday, April 30, 2025

छत्रपतींनी दिल्लीपतींची सुभेदारी नाकारली होती, तत्वांशी तडजोड केली नाही…अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना थेट चॅलेंज दिलं. अमोल कोल्हे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देणार अन् तो निवडून आणणार असं अजित पवार म्हणाले. यानंतर अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा अमोल कोल्हे यांनी अजितदादांना आवाहन केलं आहे. अजितदादांना टोलाही लगावला आहे.

अजितदादांचा एवढा दरारा आहे. त्यांनी केंद्र सरकारला बोलावं आणि कांदा निर्यात बंदी उठवावी. त्यांच्याकडे अर्थखातं आहे. तर त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा. तत्वांबरोबर राहणं योग्य आहे. त्या पक्षासोबत मी आहे. मी कुठे गेलो आहे? येणाऱ्या भविष्य काळात गणित दिसेल. आमदार कोण-कोणत्या कारणामुळे भूमिकेत आहे हा एक चर्चेचा विषय आहे. माझा ना कारखाना आहे ना कंपन्या आहेत. ना माझ्यावर चौकशी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता ठरवेल, कुणाला निवडून द्यायचं ते, असं अमोल कोल्हे म्हणालेत.
अजितदादांनी काल एका चित्रपटाचा उल्लेख केला.मात्र एका चित्रपटातील संवाद आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना दक्खनची सुभेदारी द्यावी, असं दिल्लीपतींच्या मनात होतं. दख्खनची सुभेदारी ही स्वराज्याच्या कैक पट होती. मात्र तेव्हा सुभेदारी स्वीकारली नाही. तत्वांशी तडजोड केली नाही. म्हणून तर आज ताठ मानेन जगतोय, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles