परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी डॉ. पूजा दिलीप खेडकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावले आहे. विशेष म्हणजे खेडकर या आपली आलीशान खासगी गाडी वापरतात त्यावर महाराष्ट्र शासन असा बोर्डही लावला असून, शिवाय अंबर दिवाही लावून घेतला आहे. खेडकर यांच्या या वागणुकीला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी थेट अप्पर मुख्य सचिव (सेवा) यांच्याकडे खेडकर यांच्याविरेधात तक्रार केली आहे. खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हटले आहे.डॉ. पूजा दिलीप खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची कन्या आहे. पुजा या 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला आहे. खेडकर यांनी पुणे जिल्ह्यामध्ये रूजू होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांना व्हॉटसअॅप करून काही निरोप दिले होते. स्वतंत्र बैठक व्यवस्था, गाडी, निवासस्थान, शिपाई अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी केल्या होत्या. परंतु प्रशिक्षणार्थी अधिकारी यांना अशा सुविधा देता येत नाही, असे त्यांना सांगण्यात आले होते. तसेच निवासाची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते