मुंबई – पुणे महामार्गाच्या वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. लवकरच मुंबई पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी वाहतूककोंडी कमी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
नितीन गडकरी म्हणाले आहेत की, अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार होणार आहे. मुंबईहून बेंगलोरला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे. यामुळे मुंबई पुणे मार्गावरची वाहतूक कोंडी ५० टक्क्याने कमी होणार. पुढील ६ महिन्यात नवीन रस्त्याच्या कामाला होणार सुरुवात आहे.
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले आहेत की, ”ऑटोमोबाईल क्षेत्रात आपला जगात तीन नंबर आहे. सगळ्यात जास्त जीएसटी भरणारी इंडस्ट्री आहे.” ते म्हणाले, पुढच्या पंचवीस वर्षांत डिझेल गाड्या दिसणार आहेत. पुढच्या दोन वर्षात जगाचे सेमीकंडक्टर हब बनणार अहोत.”
गडकरी म्हणाले, ”जगातील सर्वात तरूण इंजिनिअर भारतामध्ये आहे. ती आपली ताकत आहे. पेट्रोल डिझेलला जास्त पैसे जातात. संशोधन करून हे खर्च कमी होईल. आपली टेक्नोलॉजी प्रोव्हेन पाहिजे. इकॉनॉमिक पाहिलं पाहिजे. संशोधक स्वप्न पाहणारे लोक असतात. ते सगळ्यांचा विचार करतात.”
ते पुढे म्हणाले, ”येणाऱ्या काळात अनेक क्षेत्रांत रिसर्च करण्यात वाव आहे. मात्र आत्मनिर्भर भारतासाठी गाव खेड्यातील शेतकरी गरीब यांचं जीवनमान सुधारल्याशिवाय ते शक्य नाही. ग्रामीण भागात नवीन संशोधन झाले, त्यातून रोजगार निर्माण झाला.”