पुण्याच्या पाट्या तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण तुम्ही पुण्यातल्या एका इमारतीविषयी ऐकले आहे का? ही इमारत पडती आहे. होय, या पडती इमारतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील ही पडती इमारत दाखवली आहे. ही खरंच पडती नाही तर या इमारतीचे बांधकाम असे केले आहे की ती आपल्याला पडणार की काय, असा भास होतो.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही इमारत अतिशय आकर्षक असून कुणाचे लक्ष वेधून घेते. पांढरा आणि निळा रंगामुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे या इमारतीकडे सहज लक्ष जाते. ही इमारत कॅम्प परिसरात आहे.