Wednesday, June 19, 2024

पोर्श अपघात प्रकरण वडील, आजोबा आता अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

पुणे पोर्श अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात १९ मे रोजी एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श या कारने बाईक वरुन जाणाऱ्या तरुण-तरुणीला धडक दिली होती. या धडकेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पोर्श कार पुण्यातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चालवत होता. आता या प्रकरणात पोलिसांनी या मुलाच्या आईला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाने पोर्श बेदरकारपणे चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. यानंतर या मुलाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याला १५ तासांत जामीन मिळाला. यावरुन समाजमाध्यमांमध्ये आणि समाजातही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक केली होती. त्यापाठोपाठ आता आज या मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. शिवानी अग्रवाल असं त्यांचं नाव आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles