Saturday, December 7, 2024

पुणे पोर्श अपघात प्रकरण ‘ससून’मधील दोन डॉक्टरांनंतर आता अधिष्ठातांवरही कारवाई

पुणे पोर्श अपघात प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून हे प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आहे. यादरम्यान आता ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांवरदेखील कारवाई करण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्यावर कारवाई करत त्यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच त्यांच्या जागी बारामतीतील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.दरम्यान, यापूर्वी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापैकी एका डॉक्टरने ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून तीन लाखांची लाच घेतल्याचाही प्रकार समोर आलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles