Tuesday, April 23, 2024

काँग्रेसने अनेक उड्या मारणारे पाहिलेले आहेत… बाळासाहेब थोरातंचा विखेंवर हल्लाबोल

, पुण्यात काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होतं.
बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसने खूप वाईट दिवस पाहिले आहेत. अनेक उड्या मारणारे पाहिलेले आहेत. सध्या काहीजण व्यवसायिक अन् धंदेवाईक राजकारणी झालेत. सत्ता येईल त्याच्याकडे उडी मारुन जायचं पुन्हा सत्ता येईल तेव्हा पुन्हा यायचं, सत्ता मिळवायची अन् म्हणायचं आम्ही काँग्रेसमधून आलोयं आम्ही एवढा त्याग केला आहे. आम्हाला मंत्रिपद नाही असं म्हणत रडायचं. पुन्हा काँग्रेसचं आलं का पुन्हा यायचं, अशी सडकून टीका बाळासाहेब थोरात यांनी विखेंवर केली आहे. एक उदाहरण सांगतो 1978 साली एक कुटुंब काँग्रेससोबत नव्हतं. 1980 साली ते आपल्याकडे आले. त्यांना कोणाची हवा हे चांगल कळतं. त्यानंतर पुन्हा 1992 ला गेलं अन् 1995 साली पुन्हा आलं. त्यानंतर 1996 साली पुन्हा बाहेर गेले. मंत्रिपद घेतली परत 2004 साली आपल्याकडे आले, मंत्रिपद, विरोधी पक्षनेते पद घेतलं वेळ आली पुन्हा 2019 ला गेले एवढ्या उड्या मारल्या असल्याचं म्हणत त्यांनी विखेंवर टीका केलीयं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles