Saturday, March 2, 2024

माजी आमदाराच्या मुलाचा अभिनेत्रीवर अत्याचार, पुण्यात गुन्हा नोंद

कर्नाटकातील माजी आमदाराच्या मुलाने अभिनेत्री अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील माजी आमदाराने अभिनेत्रीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात राहणाऱ्या मराठी-हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ३२ वर्षीय सिनेअभिनेत्रीची माजी आमदाराच्या मुलासोबत सोशल माध्यमातून ओळख झाली. या माजी आमदार पुत्राने लग्नाचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर अत्याचार केला.
अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आरोपीने अभिनेत्रीला लग्नाच्या आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर पीडित अभिनेत्रीने लग्नाची विचारणा केली. त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यावर पिस्तूल रोखली, त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याने शिवीगाळही केली. या प्रकरणी आरोपी विरोधात पुण्यातील विमानतळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles