पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता स्वत: शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे. भाजपा ईडीचा विरोधीपक्ष संपवण्यासाठी वापर करत आहे, असाही आरोप शरद पवार यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत, ईडीने केलेल्या कारवाईचा दाखला वाचून दाखवला, सोबत रोहित पवार यांना अटकेची कारवाई होण्याच्या शक्यतेबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली.ईडी, सीबीआय, आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर हा सर्रास विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला गेला आहे. रोहित पवारांच्या बाबतीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले. रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला. असं पवार म्हणाले. रोहित पवार यांच्यावरील ईडी कारवाईबाबत रोहित पवार यांना अटक होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, याबाबत भरवसा नाही. कारण, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती, असं म्हणत शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.