पुण्यातील हडपसर परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका डंपरने अॅक्टिव्हाला मागून जोरदार धडक दिली, यामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झालाय, तर आई गंभीर जखमी झाली आहे. बुधवारी सायंकाळच्या वेळी हडपसरमध्ये ही घटना घडली. भरधाव वेगात धावणाऱ्या डंपरने अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातमध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेली या मुलाची आई गंभीर रित्या जखमी झाली. जखमी आईला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
अपघात झाल्यानंतर डंपर चालकणाने घटनास्थळावर पळ काढला. पण संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. अपघातामध्ये मृत पावलेल्या चिमुकल्याचं वय फक्त सात वर्ष होतं. शौर्य सागर आव्हाळे असे मृत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. डंपरने अॅक्टिव्हाला धडक दिल्यानंतर तो डंपरच्या चाकाखाली आला, त्याचा जागीच मृत्यू झाला.
हडपसर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर उपस्थितीत जमावाने आणि मयत मुलाच्या नातेवाईकांनी सदर डंपरला आग लावली. सदरची माहिती प्राप्त झालेनंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. त्याशिवाय अग्निशामन दलही पोहचले. पोलिसांनी लोकांना पांगवल्यानंतर अग्निशामन दलाने आग विझवली. घटनास्थळावर पळ काढणाऱ्या डंपर चालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेय.