Monday, April 22, 2024

रोहित पवारांच्या मागणीला अजितदादांना ग्रीन सिग्नल, बैठकीत लगेच आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुण्यात होते. या बैठकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. या बैठकीत रोहित पवार यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या. यावर दोघांत चर्चा झाली. यानंतर अजित पवार यांनीही मागणी मान्य केली. कालवा सल्लागार समितीची बैठक पाण्यासंदर्भात होती. या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती रोहित पवार यांनी दिली. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालु्क्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles