मराठा आरक्षणावरुन सध्या मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या सभाही आता लवकरच सुरु होतील. याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणेंनी मनोज जरांगे पाटील लहान आहेत अजून असं म्हटलं आहे.कुठल्याही राजकीय नेत्याने मराठा आणि ओबीसी अशी झुंज लावून देऊ नये. आमच्या समितीने जेव्हा आरक्षण दिलं होतं तेव्हा कुणाचं आरक्षण काढून द्या असं नाही. मात्र कुणाचंही आरक्षण काढून मराठ्यांना द्यावं या मताचा मी नाही. मनोज जरांगे पाटील यांनी अभ्यास करावा ते अजून लहान आहेत. आरक्षण कसं मिळतं? भारतीय घटनेत काय तरतुदी आहेत त्यांच्याविषयी वाचावं. मराठ्यांना विचारावं ते ओबीसी आरक्षण घ्यायला तयार आहेत का? मराठा समाज ओबीसींचं आरक्षण कधीही घेणार नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलं आहे.