व्हायरल व्हिडीओ पुण्यातील एका रस्त्यावरील आहे. रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट केलेला आहे. रस्त्यावर एक तरुण दुचाकी चालवताना दिसत आहे. या तरुणाने डोक्यावर हेल्मेट घातलेले दिसत आहे. पण हे हेल्मेट पाहून तुम्हाला वाटेल की हे खरंच हेल्मेट आहे की सशाचा चेहरा आहे? होय, या तरुणाच्या हेल्मेटचा आकार सशाच्या चेहऱ्यासारखा आहे. दूरुन कुणाला वाटेल की सशाचा चेहरा आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला असेल की हा पुणेकरांचा नवा हेल्मेट ट्रेंड आहे का? सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.