काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडील जे जे लोक भारतीय जनता पक्षात येतील त्यांच्यासाठी कमळाचे उपरणे तयार आहे. तसेच जे आले आहे त्यांना तर भाजपचे उपरणे टाकले आहेच ना? अस वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अत्यंत चांगले काम करत असून लोकांचा मोदी सरकारवरील विश्वास वाढत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहायला मिळत आहेत. सरकारमधील सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे. विरोधकांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी समाजात कोणतीही तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी भाजपची आहे.
फर्ग्युसन कॅालेज येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भेट दिली व नंतर पत्रकारांशी संवाद साधला.