पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मला अतिशय जवळचे जिल्हे देण्यात आले. सोलापूर दहा किलोमीटवर, तिथून अमरावती पाच किलोमीटर, अर्धा किलोमीटरवर पुणे आणि मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुंबईला जायला शून्य किलोमीटर… गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांत माझं असं झालंय की, नवीन काही आलं, तर माझ्या डोक्यावर टाकलं जातं.”
पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली. यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांत पाटलांनी पालकमंत्रीपदावरून खदखद व्यक्त केली आहे. पालकमंत्री म्हणून मला अतिशय जवळचे जिल्हे देण्यात आले. गेल्या चाळीस वर्षांत नवीन काही आलं की, माझ्या डोक्यावर टाकलं जातं, असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.