पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पालकमंत्रिपदाबाबत मंत्रिमंडळात कोणतेही स्पर्धा नाही. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांना याबाबत जबाबदारी दिली आहे. हे नेते एकत्र बसतील. येत्या दोन-तीन दिवसांत त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता येत्या सात ते आठ दिवसांत वितरित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.






