Friday, June 14, 2024

जिल्हाधिकारी सत्ताधारी आमदाराच्या दबावाखाली काम करतात…मतमोजणीआधी त्यांची बदली करा..प्रांताधिकाऱ्यांचे पत्र

पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. या तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे म्हणाले, सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे. सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनी खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला.‌ सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे.‌ सुहास दिवसे हे निवडणुकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते. या आमदारांचा सुहास दिवसे यांना त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या सुरुवातीपासून पाठिंबा राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वतंत्र वातावरणात पार पाडण्यासाठी सुहास दिवसे यांची बदली होणे आवश्यक आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles