Sunday, July 21, 2024

मूळच्या नगरच्या महिला IAS अधिकारी खेडकर यांची पुण्यातून बदली…’या’ कारणांमुळे शासनाने उचलल पाउल

खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले, असे आरोप करण्यात आलेल्या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.

IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, आता याच खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला आहे.

त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles