आमदार निलेश लंके हे त्यांच्या अहमदनगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील 8 हजार मुस्लिम बांधावांसोबत खेड शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश दर्ग्याचे दर्शन घेण्यासाठी आले होते.निलेश लंके आगामी लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातून निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. याबाबत निलेश लंके यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक वक्तव्य केलं. “राजकारण आणि माझ्या सोशल अॅक्टिव्हिटीचा काही संबंध नसतो. मी इच्छेसाठी कुठली गोष्ट करत नाही. राजकारण हे कधी ठरवून होत नसतं, वेळेनुसार निर्णय घ्यावा लागतो. ऐनवेळी राजकारणात निर्णय घ्यावा लागतो”, असं सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं.
अहमदनगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवणार? आ.निलेश लंकेंनी दिली प्रतिक्रिया…
- Advertisement -