राज्याचे उपमुख्यमंत्री गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रीय आहे. आता जित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांना सहकारच्या माध्यमातून राजकारणात आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी पुणे जिल्हा बँकेची निवड केली आहे. अजित पवार यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवार बारामती अ वर्ग मतदार संघातून निवडून आले होते. त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर या वर्गाची निवडणूक होणार आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता, असे सांगितले जात आहे.