पिंपरी : बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आपले बंधू युगेंद्र पवार यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचे शरद पवार यांनी ठरविले आहे. परंतु, या निर्णयामुळे काही फरक पडणार नाही. निवडून येण्यास अजितदादांना कोणतीही अडचण येणार नाही असा विश्वास पार्थ पवार यांनी पिंपरीत पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना व्यक्त केला.
युगेंद्र पवार तो मोठा आहे. त्याचा वैयक्तिक निर्णय राहील असे सांगत पार्थ पवार यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून चिंचवडही राष्ट्रवादीला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
बारामतीत अजितदादांना पुतण्या देणार आव्हान! पार्थ पवार म्हणाले….
- Advertisement -