Saturday, May 18, 2024

मुस्लिम समाज फतवे काढत असेल तर मी सुध्दा एक फतवा काढतो…राज ठाकरे गरजले….

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसला मतं देण्यासाठी, उद्धव ठाकरेंना मत देण्यासाठी मुस्लिम समाजात, मशिदींमध्ये फतवे काढले जात आहेत असं म्हटलं तसंच हे होणार असेल तर आज मी देखील एक फतवा काढतो म्हणत एक आवाहन मतदारांना केलं.

ठाकरे म्हणाले, “काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा, हे फतवे काढले जात आहेत. मशिदींमधले मौलवी जर यांना मतदान करा हे फतवे काढत असतील तर मग राज ठाकरे फतवा काढतो, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ, भाजपाचे इतर उमेदवार, शिंदेंचे, अजित पवारांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी मतदान करा. अनेकांची चुळबूळ चालू आहे ती कशासाठी? कारण मागच्या दहा वर्षांत यांना तोंड वर काढता आलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles