Tuesday, May 13, 2025

भाजपमध्ये जाणाऱ्या एकनाथ खडसेंच्या आमदारकीचे काय? शरद पवारांनी मांडली भूमिका…

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात आले होत. पक्ष फुटल्यानंतर खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत राहिले. आता ते भारतीय जनता पक्षात घरवापसी करीत असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीचा आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा चार वर्षांचा कार्यकाळा बाकी आहे. त्यामुळे खडसे आपल्या आमदाकीचा राजीनामा देणार काय? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते.

शरद पवारांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना आपण खडसे यांची आमदारकी परत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. एकदा आपण दिलेल्या गोष्टी माघारी घेत नाही, असेही पवार यानी सांगितले. खडसेंच्या पक्षांतराबाबत शरद पवार म्हणाले, की त्यांच्या इतक्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यांना दैनदिन कुटुंब चालवणेही कठीण झाले होते. त्यामुळे ते हतबल झाले होते. त्यामुळे जिथे जावून तुम्हाला सोयीस्कर होणार आहे, तेथे तुम्ही जावा असे आपण त्यांना सांगितल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles