Sunday, June 15, 2025

अमित शाह हे अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज…. उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्राच्या इतिहासात आज जर आपण डोकावून बघितले तर याचं पुण्यावर शाहिस्तेखान चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान हा जरा हुशार होता, त्याचं तीन बोटावरच निभावून गेलं. तो तेव्हा गेला तो परत कधी आलाच नाही. तासाचा शहाणपण जर का काही लोकांनी घेतला असता तर ते देखील परत कधी आलेचं नसते. मात्र ते पुन्हा आले आणि ते का आलेत? तर ते गेल्या लोकसभा निवडणुकीत जे फटके महाराष्ट्राच्या जनतेने दिले त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत? त्याची चाचपणी करण्यासाठी आले होते. ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमद शाह अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह आहेत असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा आज (3 ऑगस्ट) पार पडत आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात असलेल्या गणेश कला क्रिडा या ठिकाणी हा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पुण्यातील असंख्य शिवसैनिक उपस्थित आहेत. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केलीय. आजपासून मी अमित शाहला अहमद शाह अब्दालीच म्हणणार. ते मला नकली संतान म्हणतात, औरंगजेब फॅन क्लब म्हणतात तर मी देखील त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार. तो अहमद शाह अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशीच भाजपची राजकीय कबर बांधा. अशा प्रखर शब्दात टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles