विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे महायुतीतील खदखद समोर येत आहे. आधी शिंदे गटाचे नेत्यानी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी समोर आलीय. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये पंकजा मुंडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाबाबत नाराजी व्यक्त केलीय. लोकसभा निवडणुकीवरून भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराज झाले आहेत.
राज्यात मोठा राजकीय भूकंप करत अजित पवार, शिंदे-फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. मात्र शिंदे गटातील नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने नाराज असल्याचं म्ह्टलं जात आहे. नाराजीबाबत बोलतांना भरत गोगावले म्हणाले, नाराज होऊन काय करणार? वस्तुस्थिती ती स्वीकारावी लागेल असे मिश्किल भाष्य केलं. तर अजित पवार यांच्याबाबत थोडीफार नाराजी तर राहणारच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय. आज पंकजा मुंडे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत वडगावशेरीची जागा भाजपला मिळावी, अशी मागणी केली. भाजपचे अर्जुन जगताप वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणाले, लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही. अशी तक्रार जगताप आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पंकजा मुंडेंकडे केली. भारतीय जनता पक्षाला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नसल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.