Tuesday, June 25, 2024

अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली…

पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले. त्यानंतर २३ मे रोजी या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. मात्र या व्हिडीओबाबत आता या मुलाच्या आईने समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.

नमस्कार मी शिवानी अग्रवाल. अल्पवयीन आरोपीची मी आई आहे. मी मीडियाला विनंती करते की व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्लीज, प्लीज, प्लीज.असं त्या म्हणताना दिसत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles