Friday, June 14, 2024

पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट, मी सर्वांची नावे घेणार…आरोपी डॉ. अजय तावरे यांचा मोठा इशारा

पुणे हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. मी सर्वांची नावे घेणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांची नावं समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांच्यावर आहे. त्यांच्यासोबत डॉ. श्रीहरी हरलोर आणि शिपायी अतुल घटकांबळे यांना देखील पोलिसांनी अटक केलीये.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे अपघात प्रकरणी अटक केलेले डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अजय तावरे यांनी पुणे पोलिसांना कारवाई दरम्यान सांगितले की, ‘मला ज्यापद्धतीने अटक केली. माझे नाव ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यापद्धतीने मला कुणाचे फोन आले होते याची नावं देखील मी घेणार आहे. मी शांत बसणार नाही’ त्यामुळे आता डॉ. तावरे कोणाकोणाची नावे घेणार याकडे पुणे पोलिसांसोबत सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचे नाव समोर आले आहे. त्याबाजून पोलिस तपास करत आहेत.
पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल करण्याचा प्रयत्न केला गेला. यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. यासाठी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालने डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क केला होता. एका लोकप्रतिनिधीने फोनवरून डॉ. तावरे यांना आरोपी मुलाला मदत करण्याबाबत सांगितले असल्याचे तापसात उघड झाले आहे. याप्रकरणी आजच पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाचे दोन्ही डॉक्टर आणि शिपायाला अटक केली.

अजय तावरे यांचे वकील जितेंद्र सावंत यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ब्लड सॅम्पलममध्ये छेडछाड केली हा आरोप आहे. आरोपी त्यावेळी सुट्टीवर होते. त्यामुळे त्यांचा या आरोपात सहभाग नव्हता. जी कलम लावण्यात आली आहेत, ते बेलेबल होती. पोलिसांकडून जाणूनबुजून कलमे लावण्यात आली आहेत. अजय तावरे हे 20 दिवसांपासून सुट्टीवर होते. लोकसेवकाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये बदल केला असा आरोप पोलिसांचा होता”, अशी प्रतिक्रिया अजय तावरे यांच्या वकिलांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles